शेतकरी व किसान सभेच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी अनेक ठिकाणी रास्ता रोको. शेतकरी व किसान सभा च्या वतीने बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर फाटा येथे आंबेजोगाई लातूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. गेल्या 45 दिवसापासून बीड जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे खरिपाचे पिके सोयाबीन संपूर्ण वाळून गेला आहे.