वाशिम जिल्ह्यातील विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाथ नगरी डव्हा येथे यात्रा महोत्सव उत्साहात सुरू आहे. रथसप्तमी निमित्ताने मुख्य सोहळा पार पडणार असून, भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. या प्रसंगी नाथ संस्थानतर्फे 201 क्विंटल महाप्रसादाचे (पुरी, भाजी, बुंदी) वितरण होणार आहे, ज्याची तयारी दोन दिवसांपासून सुरू आहे. लाखो भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद वाटप केले जाईल.