लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या 78 व्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सव सोहळा पार पडला. आ.महेश शिंदे,आ.शशिकांत शिंदे आ. मनोज घोरपडे,मठाधिपती सुंदरगिरी महाराज, पुजारी आणि विश्वस्त यांच्या हस्ते श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेचे पूजन करून या रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली.