पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री इंद्रेश्वर महाराजांच्या रथोत्सव सोहळ्याला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा चालणार आहे. सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी महामृत्युंजय मंत्र होम जप पार पडला आहे. तर शनिवारी 14 फेब्रुवारीला श्री इंद्रेश्वर महाराजांच्या रथोत्सवाची सवाद्य मिरवणूक काढली जाणार आहे.