रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता धार्मिक स्थळांनाही बसला आहे. चिवेली येथील श्री देवी वाघेश्वरी ग्रामदैवत मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.