रत्नागिरी शहरातील मांडवी भूते नाका येथे एका मध्यधुंद तरुणांने धारदार कोयत्याच्या साह्याने मोटारसायकल वरून जाणाऱ्या तरुणावर वार केल्याची घटना घडली आहे. दारूच्या नशेत असणारा हा तरूण येणाऱ्या-जाणाऱ्यावर वार करत होता. अकुंश मांडवकर असे हल्ला करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. हा तरुण बराच वेळ धिंगाणा घातला होता. स्थानिक नागरिकांचा आवरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यावरही तो धावून गेला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी मद्यधुंद तरुणाला ताब्यात घेतले आहे.