रत्नागिरी शहरानजीकच्या कुर्ली समुद्रकिनारी ‘अल रिझवान’ मासेमारी नौका भरकटून किनाऱ्यावर धडकल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. समुद्र खवळलेला असताना इंजिन निकामी झाल्याने नौका अनियंत्रित झाली. सुदैवाने सातही खलाशी सुखरूप बचावले असून, बोटीचे किरकोळ नुकसान झाले आहे.