रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आज अंगारकी चतुर्थीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवीन वर्षातील पहिली अंगारकी असल्याने स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, भक्तिमय वातावरणात भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.