रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात आज सर्वपक्षीय संघटनांनी आंदोलन सुरू केले. कंपनीत रासायनिक घटक तयार होत असल्याने पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात "कंपनीला टाळे ठोका" च्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली, ज्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.