रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले असून आठवडाभराच्या कालावधीत सव्वाचार हजार लोकांची पाण्यासाठी वणवण वाढली आहे. टंचाईग्रस्तांची एकूण संख्या 42 हजार 635 एवढी झाली आहे.