रत्नागिरी : सावंतवाडी शहरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर तुंबलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी गटारात गेली. गाडी बाहेर निघत नसल्याने अखेर टोईंग व्हॅन बोलवावी लागली. जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर गाडी बाहेर काढण्यात आली. मात्र रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.