रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या 'रत्नागिरी ते पंढरपूर सायकलवारी' या अनोख्या उपक्रमाला आज सकाळी श्री विठ्ठल मंदिर, रत्नागिरी येथून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यंदाच्या वारीत ३२ हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला असून, भक्ती, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत ही वारी पंढरपूरकडे रवाना झाली.