रत्नागिरी : दाभोळ बीचवर कासव संवर्धनाला यंदा मोठे यश आले आहे. ९ घरट्यांतून ४९७ पिल्लांना सुरक्षित समुद्रात सोडण्यात आले आहे. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि वन विभागाच्या सहकार्यामुळे शेकडो कासव पिल्लांनी समुद्राकडे यशस्वी झेप घेतली आहे. स्वच्छ किनारा आणि अनुकूल वातावरणामुळे दाभोळ कासवांसाठी सुरक्षित अधिवास ठरत आहे.