रत्नागिरीतल्या मिरजोळे गावात गवा रेड्यांचं दर्शन झाले आहे. हनुमान नगर परिसरात गवा रेड्यांचा रस्त्यावर मुक्त संचार पाहायला मिळाला आहे. बिबट्या पाठोपाठ आता गवा रेडा दिसल्यानं ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्यानं त्यांचा वनविभागाने बंदोबस्त कराण्याची मागणी केली जात आहे.