रावेर तालुक्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प असलेले सुकी (गारबर्डी) धरण शंभर टक्के भरले. सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सध्या धरणातून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.