बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आंदोलक अधिक आक्रमक झाले आहे. कोरा करा कोरा करा, सातबारा कोरा करा या घोषनेने परिसर दणाणून गेला आहे, शेतकऱ्यांनी दूध, फळे भाजीपाला रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला आहे.