कोथरूडमध्ये रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकांमध्ये गुन्हेगारांचा वापर केल्याचा आणि समीर पाटील नावाच्या मोका गुन्हेगाराला संरक्षण दिल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. चंद्रकांतदादा धुतल्या तांदळासारखे आहेत का? असा सवाल करत, मोका गुन्हेगाराला कसे बोलू दिले जाते, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.