रवींद्र धंगेकर यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या पाठिंब्यामुळे नाईक बोलत असल्याचे धंगेकर यांनी म्हटले. शिवसेनेत असताना गणेश नाईक पहिल्या फळीतील नेते होते. मात्र, भाजपमध्ये ते तिसऱ्या-चौथ्या फळीत आहेत. शिंदे साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करणे कितपत योग्य आहे, असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केला.