ईपीएफओ, देशातील सर्वात मोठ्या रिटायरमेंट फंडाच्या गुंतवणूक धोरणांवर रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) चिंता व्यक्त केली आहे. कामगार मंत्रालयाच्या मागणीनुसार आरबीआयने ईपीएफओला संपूर्ण गुंतवणुकीवर एकच नियम लागू करण्यासह निधी व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ईपीएफओचे फंड मॅनेजमेंट योग्य नसल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे, तसेच स्वतंत्र नियामक प्रणालीच्या अभावावरही प्रकाश टाकला आहे.