भारताच्या बँकिंग क्षेत्रात महत्त्वाचा करार होणार आहे. यूएईची एमिरेट्स एनबीडी बँक खासगी क्षेत्रातील आरबीएल बँकेमध्ये सुमारे १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून बहुसंख्य भागभांडवल घेणार आहे. याला आरबीआयची तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. यामुळे आरबीएल बँकेची आर्थिक स्थिरता वाढून भारत-यूएई रेमिटन्स व्यवसायाला चालना मिळेल.