जमीन खरेदीतील फसवणुकीचा धोका टाळण्यासाठी योग्य कागदपत्रे तपासणे महत्त्वाचे आहे. ॲड. अमृता साळुंके यांनी एनए आणि ॲग्रीकल्चर प्लॉटिंगमधील फरक स्पष्ट केला आहे. रेरा नोंदणीकृत एनए प्लॉट अधिक सुरक्षित असतात, तर ॲग्रीकल्चर जमिनीसाठी ३० वर्षांचा इतिहास आणि महसूल नोंदी तपासणे गरजेचे आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी या सूचना महत्त्वाच्या आहेत.