यावेळी महापालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पहायला मिळाली आहे. दरम्यान नाशिकमध्ये भाजपचे कार्यकर्ते असलेल्या ज्ञानेश्वर काकड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी त्यांना त्यांच्या समर्थकांकडून घरात कोंडून ठेवण्यात आलं होतं.