जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्का, ज्वारी व गव्हाची विक्रमी आवक होत असून विशेषतः मका व ज्वारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दररोज 300 पेक्षा अधिक वाहनांची आवक होत असल्याने बाजार समितीच्या आत व बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. रांगेत उभे राहून नंबरप्रमाणे नोंद करण्याची पद्धत अयोग्य असल्याची शेतकऱ्यांची तक्रार असून, शेतीवरील वाढत्या खर्चाच्या तुलनेत मक्याला 1600 ते 1700 रुपये आणि ज्वारीला सुमारे 2000 रुपयांपर्यंतच भाव मिळत असल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे,