राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड येथील जातिवंत गाईला तब्बल 2 लाख 81 हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळालाय..या अगोदर राहुरी तालुक्यातील मानोरी येथील गाईला 2 लाख 21 हजार असा भाव मिळाला होता...माहेगाव येथील दुग्ध व्यावसायिक शेतकरी आकाश आढाव यांनी संकरित प्रजनन आणि वंशसुधारणेसाठी ही गाय खरेदी केली..