वाशिमच्या कारंजा तालुक्यात कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. रोगाची तीव्रता वाढल्याने कपाशीची झाडे करपत असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.उंबर्डा बाजार परिसरात यंदा सर्वाधिक कपाशी पेरणी झाली मात्र अतिवृष्टीमुळे पिकावर मोठा फटका बसला. त्यातच लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने अनेक शेतकऱ्यांचे पिक उद्ध्वस्त झाले. आधीच्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आता लाल्या रोगाने पिकावर केलेला खर्चही निघणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.