मालेगावच्या राष्ट्रीय एकात्मता चौक जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी चारचाकी वाहन जोरात चालवून जीवघेणी स्टंटबाजी करीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याच मैदानावर लहान मुलांपासून ते मोठ्या तरुणांपर्यंत सर्व मैदानी खेळ खेळण्यासाठी येत असतात. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक याठिकाणी पायी फिरण्यासाठी येत असताना अशा जीवघेण्या स्टंटबाजीमुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही आणि विशेष म्हणजे या मैदानाच्या परिसरात एक पोलिस चौकी सुद्धा असून असे प्रकार बिनधास्त होत असल्याने यावर कुठलीच कारवाई देखील होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून प्रशासन मोठी घटना घडल्याची वाट बघत आहे का असा सवाल नागरिक विचारत आहे.