तुर्भे इंदिरानगर येथील रेशीम कंपनीला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे काम सुरू आहे. कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी गेली असून अद्याप तरी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. सध्या आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.