मराठा मुलींबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्या नवनाथ वाघमारेंमध्ये माज आणि मस्ती कुठून आली असा सवाल उपस्थित करत ऑल इंडिया पँथर सेनेच्या दीपक केदार यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या लेकींचा अपमान करताना लाज कशी वाटली नाही, अक्कल नसणारे कुठून उगवले आहेत. तात्काळ नवनाथ वाघमारेवर गुन्हा दाखल करुन उलटा टांगून मारला पाहिजे, ऑल इंडिया पॅंथर सेना लेकीचा अपमान बिलकुल सहन करणार नाही असं केदार यांनी म्हटलं आहे.