पंढरपूरातील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. पांडुरंगाच्या गोरगरीब भाविकांना पंचतारांकित सुविधा देण्याच्या उद्देशाने तब्बल 130 कोटी रुपये खर्चून नव्या दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.