मुसळधार पावसामुळे देहरंग (अप्पासाहेब वेदक) धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने पनवेलकरांचे पाणीटंचाईचे संकट टळले आहे. गाळ कमी झाल्यानंतर प्रक्रिया करून नियमित पाणीपुरवठा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.