नोव्हेंबरमध्ये कवडीमोल 300 रूपय दरामुळे अडचणीत सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. बाजारातील पुरवठा घटताच मागणी वाढली आणि केळीच्या दरात तेजी दिसून येत आहे. सध्या केळीला प्रतिक्विंटल ८०० रुपये भाव मिळत असून शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. मागील महिनाभर केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट आता काही प्रमाणात दूर झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात केळीला मिळणारे कवडीमोल दर शेतकऱ्यांच्या चिंता वाढवत होते.