छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी येथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. अतिक्रमण विरोधी पथक याठिकाणी पोहोचले असून, जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण काढले जात आहे. विशेष म्हणजे स्थानिकांनी तीन महिन्याची मुदत देण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाकडून आजपासून अतिक्रमण काढण्यात सुरुवात झाली आहे.