प्रजासत्ताक दिन भारताच्या संसदीय लोकशाही स्थापनेचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान २६ जानेवारी १९५० रोजी देशभरात लागू झाले. या संविधानाने प्रत्येक भारतीयाला समान संधी, समान अधिकार आणि भेदभावविरहित एक नागरिक एक मत या तत्त्वावर आपले राज्यकर्ते निवडण्याचे स्वातंत्र्य दिले.