प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय तिरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. हे नेत्रदीपक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत आणि सेल्फी घेत आहेत. यंदाचा प्रजासत्ताक दिन नवी मुंबईकरांसाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण पाच वर्षांनंतर लोकशाही मार्गाने निवडून आलेले प्रतिनिधी पालिका कारभार सांभाळणार आहेत.