मुंबईच्या जुहू परिसरात 200 इमारतीत राहणारे नागरिकांनी पालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला आहे. मतदानावर बहिष्कार टाकल्याचा माहिती देणारे बॅनर जुहू रुईया पार्क,कराची सोसायटी परिसरात लावण्यात आले आहेत. जुहू परिसरात मिलिटरी रडार (Military Radar) असल्यामुळे 35 वर्षापासून इथली 200 धोकादायक इमारत आणि दोन झोपडपट्टी विकासकापासून रखडली आहे.