मीरा-भाईंदर पूर्वेकडील इंद्रा नगर परिसरातील एक मन सुन्न करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रचंड गर्मी आणि उकाड्यामुळे हैराण झालेले स्थानिक झोपडपट्टीतील नागरिक रात्रीच्या वेळी चक्क जवळच्या स्वर्गीय आनंद दिघे मैदानावर झोपण्यासाठी जात आहेत.