महसूल अधिकाऱ्यांच्या निलंबनाविरोधात पुण्याच्या भोरमध्ये महसूल कर्मचाऱ्यांच कामबंद आंदोलन करण्यात आले. राज्यभर सुरू असलेल्या कामबंद आंदोलनात भोर महसूल विभाग सहभागी झाला आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, त्यामुळे महसूल यंत्रणा ठप्प झाली आहे. याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसला आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, महसूल सेवक आणि कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.