पुण्यातील मावळ तालुक्यातील साळूंबरे गावात चारसूत्री पद्धतीने भात लागवड सुरु आहे. साळूंबरे गाव पिंपरीचिंचवड महानगरपालिकेच्या जवळ आहे. अजूनही या गावात शेतकरी चारसूत्री पद्धतीने भात लागवड मोठ्या प्रमाणात करत असतात.सध्या पाऊस ही पोषक पडत असल्याने भात लागवडीना वेग आला आहे. गावकऱ्यांनी इंद्रायणी वाणाच्या भाताची दोन एकर क्षेत्रात चारसूत्री पद्धतीने लागवड केली आहे.