जून महिना लोटल्यानंतरही आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना 6 जुलैपासूनच्या पावसाने साथ दिली आहे. संततधार व दमदार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात पाणीच पाणी झाले व त्यानंतर शेतकरी कामाला लागला आहे. पावसामुळे शेतीच्या कामाची गती वाढली असून गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 42,048.90 हेक्टर क्षेत्रांत भात लागवड करण्यात आली आहे. यामध्ये 33,875.31 हेक्टर क्षेत्रात रोवणी, तर 8,173.59 हेक्टर क्षेत्रात आवत्या टाकण्यात आल्या आहेत.