कोकणामध्ये प्रामुख्याने मोठया प्रमाणात घेण्यात येणाऱ्या भातशेती लावणीला आता सुरुवात झाली आहे. दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात लावणीयोग्य पाणी साचल्याने शेतकरी राजा या भातपीक लावणीत व्यस्त झालाय. शेतात चिखली करण्यासाठी बैलजोडी घेऊन नांगरणी करून ही भातशेती लावली जाते.त्यामुळे दुसरीकडे अवकाळी पावसाने यंदा लवकर सुरुवात केल्याने जी लांबलेली पेरणी होती ती यंदा उशिरा झाल्यामुळे यंदा लावणी सुद्धा लांबणीवर गेली मात्र आता लावणीयोग्य भातपीक झाल्याने शेतात शेतकरी या भातपिकाची लावणी करताना पाहायला मिळतोय.