परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुका हा फळबागांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी संत्रा आणि मोसंबीची लागवड करतात. यावर्षी मात्र या फळबागांवर उन्हाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे मोसंबीच्या बागेत झाडांना लागलेली फळे काळी पडत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. वाढत्या उन्हामुळे ही फळे आता काळी पडत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.