जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे गुलाब फुलाला फटका बसतोय. उष्णतेमुळे फुल शेती धोक्यात आली आहे. उष्णतेचा कडाका प्रचंड असल्याने शेतात गुलाबाचे फुल खराब होत आहेत. यावर्षी लावलेला खर्चही निघण शेतकऱ्यांसाठी कठीण झालं आहे. यामुळे गुलाब उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कृषी विभागाने उपाययोजना करण्याची फुल उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.