जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत गेल्या सप्टेंबर महिन्यापासून झपाट्याने वाढ होत आहे, या वाढलेल्या पाण्यामुळे लोणार सरोवरात अकराव्या व बाराव्या शतकातील अनेक प्राचीन मंदिरे ही पाण्यात बुडाली आहेत.. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे लोणार सरोवराची जैवविविधता ही धोक्यात आली आहे. मात्र यावर केंद्र आणि राज्य सरकारचा कुठलाही विभाग दखल घेत नसल्याने आता लोणारवासियांनी चक्क "वर्ल्ड हेरिटेज सेंटर" व "युनेस्को" ला पत्र लिहून याबाबत हस्तक्षेप करून तात्काळ लोणार सरोवर वाचवावं , अशी विनंती केली आहे.