पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या अनेक जाहिरात होर्डिंग्जवरील फ्लेक्स फाटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.सध्या मान्सूनपूर्व जोरदार वारे वाहत असल्याने हे फाटलेले फ्लेक्स आणखी सैल होऊन रस्त्यावर पडण्याची किंवा होर्डिंगच्या संरचनेला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः मुख्य रस्ते, चौक आणि गर्दीच्या ठिकाणी असलेल्या काही होर्डिंग्जची स्थिती धोकादायक बनली असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.