बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मेहकर तालुक्यातील वाघदेव नदीला पूर आला असून मोताळा तालुक्यातील नळगंगा नदीही दुथडी भरून वाहत आहे. तर अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. रायपूर येथील बाजारपेठांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे.