नांदेड - हिंगोली महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं असून महामार्गावरील अपघातात अनेकांचा जीव गेल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत. गावालगत असलेल्या महामार्गाला भुयारी मार्ग देण्याच्या मागणीसाठी गावकरी रस्त्यावर उतरले होते. नांदेडच्या दाभड इथं गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे नांदेड - हिंगोली महामार्ग ठप्प झाला होता.