जळगावच्या जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात घरगुती सिलिंडरसाठी 'रास्ता रोको' करण्यात आला. संतप्त ग्राहकांनी रिकामे सिलिंडर रस्त्यावर आडवे टाकून रास्ता रोको आंदोलन केले. घरगुती गॅस सिलेंडर साठी महिनाभर प्रतीक्षा करुनही एजन्सीकडे वारंवार फेऱ्या मारूनहीसमाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे.