पुण्याच्या भोर तालुक्यातील खानापूर ते कान्हवडी दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. परिसरात 20 ते 30 फूट लांब मोठं मोठे खड्डे पडल्यानं, यातून मार्ग काढतांना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.