रोहा शहराच्या प्रवेशद्वारावर असलेला रस्ता सध्या अत्यंत खराब स्थितीत आहे. रेल्वे क्रॉसिंग फाटक ते पडम गावापर्यंतच्या मार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरू आहे, मात्र त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांसाठी तर हा रस्ता मोठी डोकेदुखी ठरत आहे.