राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पार्टटाइम आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी टीकास्त्र डागलंय. महिला आयोगाच्या अध्यक्षा या अजित पवार यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यामुळे पार्ट टाईम महिला आयोगाच्या अध्यक्ष बदलून पूर्ण वेळ अध्यक्ष महिला आयोगाला द्यावा, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.